Saturday, January 24, 2009

ओसरणार्या अश्रुंना.........



.


जीवणरुपी वाटेला,


वळणरुपी घाट.


ओसरणार्या अश्रुंना,


आठवणींची साथ.



----मौसम

गारवा मनात



.


गारवा मनातगारवा पानातदाटून येता ढग,


चिव-चिव पक्ष्यातभिर-भिर नजर,


सगळ्यांची आसमंतातकोसळणार्या जलधारांचा,


एकाएकी माराटपोर्या बोचक्या थेंबाचा,


स्पर्श हवा-हवासागारवा मनातगारवा पानातपरत एकदा......!!



-मौसमी

स्विकार ना वस्तुस्थिला


.


जीवनगाडी ही थांबवून बघ पण थांबेलच असे नाही...!


मनाजोगा प्रवासची अपेक्षा कर, हवा तसा होइलच असेही नाही...!


सांभाळून पहा मनाला पण भाव लपतीलच असे नाही....!


भावनेचा खेळ हा,स्विकार ना वस्तुस्थिला बघ वेदना पळतात की नाही!!!


---मौसम


.

मन भावनांचा गुंता..



.


मन जाणून अजाण..!


शब्दांची उलाढाल..!


मन भावनांचा गुंता..!


टोक शोधायला कठीण...!



----मौसम

आनंदाश्रुंचे मोल शोधीते मी....!



.


घनदाट या नभातही


एक तारा शोधीते मी,


निर्मनुष्य या वाटेवरही


हातात-हात शोधीते मी,


सतत ओघळ्नार्या अश्रूत


आनंदाश्रुंचे मोल शोधीते मी,



-----मौसम


उत्सव अन, विस्तव........!


.

उत्सव अन, विस्तव........!


आहे आयुष्यातील एक वास्तव......!


मोहरलेला क्षण मी ही आठवतेय,


मनात तेच भाव माझ्यातही जपलेय,


कळत नाही नेमके कसे??पण नियतिने दुरावलेय....!


-मौसम्

.

दाद तर मिळाली..



.


ओळींना यमकाची साथ मिळाली,


शब्दांना सुरांची साद मिळाली,


संगतीत कवितेची कल्पना मिळाली,


मागे वळून बघू नकोस ,


ही तुलाच आहे दाद मिळाली.



---मौसम


.

ह्रदयाचे ठोके...!



.



ह्रदयाचे ठोके जेव्हा कधीना -कधी थांबतील....!


कदाचीत तेव्हाच मित्रा भाव मनातील जागतील.....!


आधाराच्या काठीसाठी पाय क्षणभर थांबतील....!


पण काठीच मोडली जातेय हे पाहून,अश्रू ही आपली वाट काढतील.....!


जेव्हा ह्रदयाचे ठोके थांबतील....!!!!


----मौसम


.

इंद्रधनु...!


.


तुच सख्या माझ्या मनी,


तुच सख्या माझ्या ध्यानी,


बस एकदा घे हात-हाती,


तूच इंद्रधनु माझ्या अंतरंगी,


----मौसम्

.

Friday, January 23, 2009

"कानोसा"


.


कानोसा" सरी पावसाच्या कोसळल्यातही,


साद गुलाबी थंडीची आलेतही,


अजुनही वाटच पहते ही सखी वेडी,


साजनाला याचा जराही कानोसा कसा नाही??


.....मौसम


.

वाट..????



.


वाट...कधीच न संपनारे अर्मयाद घाट...!!


जीव घेनारा क्षणांचा लांबलचक थाट...!!


विरहात नाही बरका तुझा वा तिचा हात...!


हयात आहे तिच्या-तुझ्या खोडकर नशीबाचा हातात हात...!!



---मौसम



.

अजबच आसतो ग हा एकटेपणा.....!!



.


डोळ्यात स्वप्नाचा डोगर घेउन...!


मन अश्रुने ओलेचिब होऊन...!


उचबळून आलेल्या भावनांना हृदयात साठऊन.....!


आपणच नाते पाळायचे...आज येइल,उद्या येइल म्हणून,खोटे-खोटेच मनाशी खेळायचे...!


सांग ना आता तुच आपणच का जिवंतपणी मरन स्विकारयचे????



-मौसम


.

जीवनाचा प्रवास..!


.


जीवनाचा प्रवास का एकटा वाटतोय..!


तेच चंद्र-तारे परके वाटताताय....!


ही वाट कुठे जाणार काहीएक अंदाज नाहीयं....!


बस पावल नेतील ती नवीन वाट समजायचीयं.......!


डोळे काहीसे पणावलेले म्हणतात काहीतरी बोलायचयं......!


मनातील स्वप्न असमतोलातेने हळूह्ळू दीसेनासे होतातायं.....!


काय शोधतयं मन,काय हवय नेमक आयुष्यस कळण्यास मार्ग नाहीयं......!


कुठे चुकतयं का माझ,समजायला वाट नाहीयं......!


अश्रु देखील स्वार्थी,वाट द्यायचे सोडून डोळ्यातच सामावतातायं......!


खोट हसू आणन्यास प्रव्रुत्त करतातयं हेच हे स्वार्ती अश्रु.....!


कसला हा नाइलाज आहे, आयुष्याचा,इच्छा नसताना हसावलागतयं???


....मौसम


.

अश्रु ओघळूच देत नाही...!



.


माझाही फारस काही वेगळ नाही...!


फरक एवढाच की मला हे बोलवत नाही...!


भान माझे ही हरवते,शांत मला ही बसवत नाही...!


एवढ खर मात्र मी अश्रु ओघळूच देत नाही...!



......मौसमी



.

स्वप्न केवळ स्वप्न नव्हते ते...!



.


स्वप्न केवळ स्वप्न नव्हते ते...!


एक कटूसत्याची पायवाट रे...!


एक-दुसर्यासाठी जगता-जगता थेट,


नियतीने मारलेला एक चपराक रे...!



......मौसम


.

शेवटी मी स्वताःला आवरलय..!!



.
शेवटी मी स्वताःला आवरलय...!


माझ्या मनाला नाइलाजाने सावरलय...!


स्वप्न केवळ स्वप्नच हे केव्हाच कळलय..!


तरीही वेड मन माझ तुझ्या मनावर भाळलय..!



....मौसम


.

एक स्वप्न मी ही पाहीले...!!

.


एक स्वप्न मी ही पाहीले..!

सर्वस्वाने मनाला ही वाहीले...!

परीणामाला न जुमानता आकंठ बुडत राहीले...!

आयुष्य समजुन,स्वप्नाला मीच माझी न राहीले...!

-मौसम

.

माझ्या हातात-हात...!



.



आयुष्याची कठीण वाट..!


डोळ्याना केवळ धुक्यांची साथ..!


दिसेनास्या या दुर्मीळ, अवघड वाटेत..!


असुदे सदैव तुझा,माझ्या हातात-हात...!


.....मौसमी


.

"नातं"



.


"नातं" नेमक काय हे मलाही जाणयच होतं!


मना-मनांच्या या भावनेत तुम्हा सर्वाना आणायच होतं!


स्नेहाच्या या बंधनात तुम्हालही जोडायच होतं!


न पाहता आपल्यातहीकसे जुळ्ले ते विचारायच होतं!



......मौसम


.

पहीली भेट....!



.


तोही दिवस येइल प्रत्यक्षात,ह्र्दयाशी ह्रदयाची भेट होइल थेट....!


नकळत अविभाज्य घटक होइल,जणू मी फुल तू देठ.....!


तुझी माझी नजरा-नजर जणू इंद्रधनू सुरेख.......!


हवेचा हळूवार झोका हरवून देइल भान करुन देइल समेट......!


तुझे शब्द माझ्यासाठी-माझे तुझ्यासाठी दोघही एकमेकांच्या कवेत.....!


जणू काही प्रेमाच्या या सागरात भरती-ओहोटीची भेट............!



.....मौसम

कस सांगू तुला??



.


प्रतिक्ऱुती तुझी डोळ्यासमोरच आहे....!


विचार सारे केव्हाच सुन्न झाले आहे.....!


पायालाही अचानक,वेगळाच वेग आहे.....!


कस सांगू तुला,मला तुझी किती आस आहे....!!!



.....मौसम


.

अंतर कितीही असलं दोघात....!






.



निस्वार्थ हे घाव माझे,निस्वार्थ हे मिलन तुझे...!



वियोगालाही दिशा देतील मनातील निस्वार्थ हे भाव...!



निस्वर्थी या प्रेमास तुझे नी मझे नाव...!



हे निस्वर्थी प्रेमा तुझ्या गाभार्यात स्थान हेच माझे प्राण.....!





....मौसम



.



.


जीवनाचा एकांत मलाही आता सहावेना...!


एकटया या वाटेवर मलाही चालवेना....!


माझ्या डोळ्याचे अश्रु आज माझ्याच डोळ्यात माववेना...!


यायचय रे पुन्हा आपल्या जुन्या पायवाटेवर,मलाही आता राहावेना....!



......मौसम


.

आशा.....!



.


आशा वाटते नेहमी एखादया निराशेनंतर...!


आशेमध्ये आपले अंतरंग पुरेपूर अधांतर....!


तुझे-माझे दोघांचेही मन आशेला समांतर....!


दुर असुनही आपल्यात, सदैव सावलीचे अंतर....!!!



....मौसम



मी तुझी तू माझा....!



.


मी तुझी तू माझा हे मी देखील मानलय....!


तुझ्याच आठवणीत अश्रू झऱ्या प्रमाने वाहीलेय....!


खेळ होता मनाच,नाही जीवनाचा हे मात्र मला कळून चुकलय....!


तरीही आशा आहे जिंकण्याची कारण....


माझ मन माझच राहील नाही हे तुलाही काळून चुकलय..........!



......मौसम


.

आधार....!



.


नको येवू देऊ असला विचारही यापुढे मनात....!


एक छोटासा कानमंत्र घे तू ध्यानात.....!


हे जीवन नाही पोरखेळ क्षणभराचा....!


नजर काय आशा आहे मन आपले जुळनार.....!


तू माझा आणि मी तुझा आधार बघ होनार...........!



......मौसम


.

ह्रदयाचे ठोके.....!


.

ह्रदयाचे ठोके जेव्हा कधीना -कधी थांबतील....!


कदाचीत तेव्हाच मित्रा भाव मनातील जागतील.....!


आधाराच्या काठीसाठी पाय क्षणभर थांबतील....!


पण काठीच मोडली जातेय हे पाहून,अश्रू ही आपली वाट काढतील.....!


जेव्हा ह्रदयाचे ठोके थांबतील....!!!!


......मौसम


.

शब्द.........!



.


शब्दच तुझे मित्र राहतील...!


वाट तर न संपनारी राहील...!


वेळ येवू दे मग,तुझेच "शब्द" साद घालतील.....!


स्वार्थी या जगात,तुझेच 'शब्द्' तुला आधार देतील.....!


---- मौसम



.

हेच ते गणित बघ जीवनाचे.....!!



.


हेच ते गणित बघ जीवनाचे...!


बेरीज-वजाबाकी करुन सुद्धा उत्तर शुन्य येण्याचे...!


रक्ताळ्लेले ह्रदय घेउन देखील मनाला हळूवार समजवण्याचे...!


दार बंद असुनही आशेचे किरण शोधन्याचे...!


अखेरचे श्वास मोजतांनाही ज्या व्यक्तिसाठी जळतोय तिलाच,सुखी पाहण्य़ाचे....!


हेच ते गणित बघ जीवनाचे.......!



......मौसम


.

अकुंर...!



.


विरहाने खुप काहि शिकवलं....!


लवचिक मनाला अधिकच अबोल बनवलं....!


प्रेम केलं हाच गुन्हा होता ना??


शेवटी उष्णतेतच अकुंर डोकावतात मनाला समजावल........!


......मौसम्


.

विरहाचे दोन क्षण .....!



.


विरहाचे दोन क्षण-दोन जन्मा समान वाटत आहे....


मला आठवून बघ,म्हणतोस,सांग मी विसरली कधी आहे....


तुझ्या ह्रदयाचा एक-एक ठोका माझ्या ठोक्याची साद आहे....


रडता-तर मलाही येत रे पण तुझ्या-माझ्या अतुट प्रेमाचा हा हुंकार आहे....


पण तरीही हसते बरका कारण विरहाचा अर्थच कालांतराने प्रेमाचे खरे-खुरे मिलन आहे........



-मौसम


.

आयुष्य हवय मला..आयुष्य हवय मला...!



.


आयुष्य हवय मला..आयुष्य हवय मला...!


दाखवुन द्यायचय मला..तुझ्याशिवाय जगता येतय मला..!


सावकाश का होइना ...एवढयाश्या आयुष्याला जिंकायचय मला...!


एका अटळ मरणाला...कवटाळायचय कधी ना कधी प्रत्येकाला...मग सांगा मला का हरताय या आयुष्याच्या प्रवासाला.....!!



.....मौसम



.

मानुष्य



.


नात हे हर्शाच, झिजुदे आयुष्य,


जीवनातील हाच काल्प्नीक धनुष्य,


होउनिया परीस,उजळून टाक सर्वस्व,


जो समजेल हा नीतळ स्पर्श,


तोच खरा-खुरा मानुष्य


......मौसम


.


गोष्ट वेड्या पावसाची.....!



.


गोष्ट वेड्या पावसाची ...


काय-नी डोळ्यातुन वाहनार्या अश्रुची...


कधी सुखद तर कधी दुखद आठवणींची...


कोसळतात दोन्हीही अचानक न ठेवता ,


वाट तुझ्या-माझ्या भिजन्याची....


करतात शान्त विसावून,


गोष्ट वेड्या या मनाची....!!



....मौसम

.

गंध तुझाच हा दर्वळनारा......!



.


तु कुठे आहेस माहित नाही तरीहीडोळे तुलाच शोधत आहे....!


किती वेडा हा वारा बघ,अनोळखी चक्रव्युहात खेचत आहे....!


गंध तुझाच हा दर्वळनारा,भुंगा ही अवखळ जानून आहे....!


तरीही अजानतेने हे मन,शोधात तुझ्या सैरावैरा पळत आहे....!


....मौसम


.

आशावादी जीवन ही खरचं अनमोल भेट आहे....!


.


आशावादी जीवन ही खरचं अनमोल भेट आहे....!


तुझ्या-माझ्या नाही सगळ्यांसाठी फुलाच देठ आहे...!


ओघळणाऱ्या अश्रुंना आजही दवबिंदुचा भास आहे....!


म्हणून तिच्या आठवणीचा गंध काही इतरांहुन खास आहे....!


....मौसम


.

आशावादी जीवन ही खरचं अनमोल भेट आहे....!

.

आशावादी जीवन ही खरचं अनमोल भेट आहे....!

तुझ्या-माझ्या नाही सगळ्यांसाठी फुलाच देठ आहे...!

ओघळणाऱ्या अश्रुंना आजही दवबिंदुचा भास आहे....!

म्हणून तिच्या आठवणीचा गंध काही इतरांहुन खास आहे....!

....मौसम

.

श्वास...!



.



माझाच राहील श्वास जो,पुढेही तुला सन्गत राहील....!


माझे एक-एक शब्द जेपुढेही तुला आठवत राहील....!


मी नसेल कदाचीत येथेपुढेही श्वास भानावर आणत राहील....!


माझे श्वास.........!!!!



....मौसम

चौकट म्हणजे.......!



.



चौकट म्हणजे काय सीमाच की,


त्या बाहेर नाही जायचे ही एक समजुतच की,


समजायचे या चौकटीला आपलेच विश्व की,


मग स्वप्नही दिसतील चाकोरीतच की,


खुशाल झोप तु मग शान्त भव्य अशा विळख्यातही...!!



.......मौसम



.

पहिल्या भेटित.........!


.


पहिल्या भेटित शांत बसायचही नसत..पण बड्बड् करुन थकायचही नसत....!


पहिल्या भेटीत एकमेकांना आजमावायच असत...इच्छा असुन सुदधा मनातल मनातच ठेवायच असत.....!


पहिल्या भेटित खळखळुन हसायच असत,शब्द नाही सुचले तरि डोळ्यांनी बोलायच असत...!


डोळ्यानीच हळूवार स्पर्श करायच असत....पहिल्या भेटीत...पहिल्या भेटीत.......!


.......मौसम


.

धागे हे गुन्ता-गुन्तिचे...!


.


भोग नशिबाचे की खेळ नियतीचे,


दुरुन दिसणारे हे डोंगर आनंदचे,


राहुन-राहुन सतावणारे धागे हे गुन्ता-गुन्तिचे,


हेच का ते नाते मनामनाचे?हेच का ते क्शन....?


नकळत जुळुन तुटलेल्या दोन जीवाचे?


.....मौसम


.

माझ्याही भावना दुभ्नगतात...!!


.

"अश्रुंही पूरमय होतात,
ढग् ही घनघोर होतात,
लक्श दे तु ऐकला नाहिस,
तुझ्या प्रवाहा सोबत ,
माझ्याही भावना दुभ्नगतात...!!
माझ्याही भावना दुभ्नगतात...!!

........मौसम

.

माझे अश्रु.....!


.


"जायच नाही रे पण जावच लागणार,

माझा रस्ता मला शोधावाच लागणार,

मागे वळुन मी स्वताच नाही पाहणार,

कारण माझे अश्रु मलाच नाही साम्भाळ्णार...."!!


....मौसम्

.

जायचय्.....!!!!!


.


जायचय् ना मग खुशाल जा,

पण मागे पलटुन पहतोस का?

सान्ग ना तुला थाम्बायचय्,

मग अडवायची वाट पाहतोस का?


....मौसम!!!


.