.
जीवणरुपी वाटेला,
वळणरुपी घाट.
ओसरणार्या अश्रुंना,
आठवणींची साथ.
----मौसम
.
एक स्वप्न मी ही पाहीले..!
सर्वस्वाने मनाला ही वाहीले...!
परीणामाला न जुमानता आकंठ बुडत राहीले...!
आयुष्य समजुन,स्वप्नाला मीच माझी न राहीले...!
-मौसम
.
.
तोही दिवस येइल प्रत्यक्षात,ह्र्दयाशी ह्रदयाची भेट होइल थेट....!
नकळत अविभाज्य घटक होइल,जणू मी फुल तू देठ.....!
तुझी माझी नजरा-नजर जणू इंद्रधनू सुरेख.......!
हवेचा हळूवार झोका हरवून देइल भान करुन देइल समेट......!
तुझे शब्द माझ्यासाठी-माझे तुझ्यासाठी दोघही एकमेकांच्या कवेत.....!
जणू काही प्रेमाच्या या सागरात भरती-ओहोटीची भेट............!
.....मौसम
.
विरहाचे दोन क्षण-दोन जन्मा समान वाटत आहे....
मला आठवून बघ,म्हणतोस,सांग मी विसरली कधी आहे....
तुझ्या ह्रदयाचा एक-एक ठोका माझ्या ठोक्याची साद आहे....
रडता-तर मलाही येत रे पण तुझ्या-माझ्या अतुट प्रेमाचा हा हुंकार आहे....
पण तरीही हसते बरका कारण विरहाचा अर्थच कालांतराने प्रेमाचे खरे-खुरे मिलन आहे........
-मौसम
.
.
आशावादी जीवन ही खरचं अनमोल भेट आहे....!
तुझ्या-माझ्या नाही सगळ्यांसाठी फुलाच देठ आहे...!
ओघळणाऱ्या अश्रुंना आजही दवबिंदुचा भास आहे....!
म्हणून तिच्या आठवणीचा गंध काही इतरांहुन खास आहे....!
....मौसम
.