Saturday, January 24, 2009

ओसरणार्या अश्रुंना.........



.


जीवणरुपी वाटेला,


वळणरुपी घाट.


ओसरणार्या अश्रुंना,


आठवणींची साथ.



----मौसम

गारवा मनात



.


गारवा मनातगारवा पानातदाटून येता ढग,


चिव-चिव पक्ष्यातभिर-भिर नजर,


सगळ्यांची आसमंतातकोसळणार्या जलधारांचा,


एकाएकी माराटपोर्या बोचक्या थेंबाचा,


स्पर्श हवा-हवासागारवा मनातगारवा पानातपरत एकदा......!!



-मौसमी

स्विकार ना वस्तुस्थिला


.


जीवनगाडी ही थांबवून बघ पण थांबेलच असे नाही...!


मनाजोगा प्रवासची अपेक्षा कर, हवा तसा होइलच असेही नाही...!


सांभाळून पहा मनाला पण भाव लपतीलच असे नाही....!


भावनेचा खेळ हा,स्विकार ना वस्तुस्थिला बघ वेदना पळतात की नाही!!!


---मौसम


.

मन भावनांचा गुंता..



.


मन जाणून अजाण..!


शब्दांची उलाढाल..!


मन भावनांचा गुंता..!


टोक शोधायला कठीण...!



----मौसम

आनंदाश्रुंचे मोल शोधीते मी....!



.


घनदाट या नभातही


एक तारा शोधीते मी,


निर्मनुष्य या वाटेवरही


हातात-हात शोधीते मी,


सतत ओघळ्नार्या अश्रूत


आनंदाश्रुंचे मोल शोधीते मी,



-----मौसम


उत्सव अन, विस्तव........!


.

उत्सव अन, विस्तव........!


आहे आयुष्यातील एक वास्तव......!


मोहरलेला क्षण मी ही आठवतेय,


मनात तेच भाव माझ्यातही जपलेय,


कळत नाही नेमके कसे??पण नियतिने दुरावलेय....!


-मौसम्

.

दाद तर मिळाली..



.


ओळींना यमकाची साथ मिळाली,


शब्दांना सुरांची साद मिळाली,


संगतीत कवितेची कल्पना मिळाली,


मागे वळून बघू नकोस ,


ही तुलाच आहे दाद मिळाली.



---मौसम


.